चारोळी
चारोळी
1 )भेट अपुली अपुर्व या प्रेमाची
वणव्यातल्या निखाऱ्यातली
सावली मिळता आधार प्रितीचा
जणु क्षणात ह्रदयात विसावली
2)आधार प्रितीचा शोधू लागली
मरनान्तक वेदना साहू लागली
चहुकडे होता गिद्धांचा जमाव
शील आपुले वाचवू लागली
3) मैत्रीची व्याख्याच ही निराळी
मानवापेक्षा अद्वितिय सत प्रेमाचे
मानवाने विकली आहे मानवता
सुंदर असे ते जगने माय लेकराचे
4)बंधुत्व ,सत्य, शांती नांदो मनामनात
विश्वात मानवांचे उजळावया ललाट
वैरत्व भावनांच्या ढळू देत सर्व भिंती
देशाची सेवा करुन जागवी नव पहाट
5)सारूनी वैरत्व भावना विश्वात
सर्वधर्म समभाव एक असावा
मानवता महाश्रेष्ठ कर्म मानुनी
खरा तो एकची धर्म जाणावा
