बंधन
बंधन
झिजून झिजून सुगंध देते चंदन
माणसाच्या जीवनात किती असावे बंधन
जीवन जगताना जीवनाला आहे मर्यादा
आपण पाळतो त्या सदा सर्वदा
बोलताना बंधन जगताना बंधन
यातूनच फुलते जीवनाचे नंदन
गरिबाला गरिबीचे बंधन
कर्त्याला कर्माचे बंधन
चरित्राला चारित्र्याचे बंधन
जगणाऱ्याला जगण्याचे बंधन
आणि जीवनाला आयुष्याचे बंधन
बंधन बंधन किती असावे बंधन
महात्म्यांच्या कर्तुत्वाला करतो आपण वंदन
झुगारून कर्म केले त्यांनी सर्व समाजबंधन
बंधनालाही असावे कुठेतरी बंधन
तरच होईल मानवी जीवनाचे
सुगंधी चंदन आणि नंदन
