बकुळफुले
बकुळफुले
भले मोठे झाड ऐटीत मिरवते
बकुळीचे माझे लाडके झाड
या झाडाला पाहण्यासाठी
माई तू वेळ काढ
गर्भश्रीमंत अशी सुवासिक फुले
सुकली तरी ही सुगंध देतात बकुळ फुले
माझा बालपणीचा काळ सुखाचा
वंदनासमवेत बकुळफुले वेचण्याचा
वेचता वेचता खूप होई आनंद
ओंजळभर फुलांचा वास घेताना मन होय धुंदबेधुंद
फुले वेचली काही रुमालात बांधली
काही फुलांचा गजरा करुन केसात माळली
ही फुले जेव्हा सुकतात
परत पाण्यात टाकताच ती छान उमलतात
बकुळफुले वह्या, पुस्तकात ठेवण्याचा माझा छंद
पाने चाळताना येतो मस्त सुगंध
बकुळीसोबत श्रीकृष्णाच्या जुळल्या प्रेमभावना
बकुळफुलांचा सुगंध येताच कसे आवरु या मनाला.....
