बिडी..!
बिडी..!
माझ्या लहान पाणी घरी
आमचा तंबाखूचा व्यापार असायचा
त्या काळी तंबाखू खाणंं
विडी ,सिगरेट ओढणं नवल नसायचं
मिसरूड फुटलं की पोरं
एखाद दुसरं व्यसन करायची
कारण ती त्यांच्या मते
वयात यायची आणि सक्षम पण व्हायची
हे सारं स्वयं घोषित
ते आपल्या आपणच ठरायचंं
आणि थोडं झाकून
थोडं बेधडक जीवन चालायचं
पूर्वी वाईट गोष्टींचं अनुकरण
भया पोटी लगेच नाही व्हायचं
भडव्या पासून रांडच्या पर्यंत
च्यायला मायला बाहेर पडायचं
दुकानात जाण जणू
मोठा गुन्हा असायचा
गोळ्या घेताना देखील
अंगाला घाम फुटायचा
रॉयल सिन्नर गणेश बिडी ब्रँड
आपापले रूप घेऊन असायचे
दुकानदाराची संशयी नजर झेलत
ते आमच्या हाती पडायचे
बिडी खरेदी वडीलधाऱ्यांसाठी
अधून मधून आज्ञेने व्हायची
आणि फुसकी रिकामी बिडी
बंडलात आली की दुकान वारी घडायची
पैश्याच मोल इतकं मोठं
की डबा कपाटात आणि
किल्ल्या वडीलधाऱ्यांच्या
कनवटीला जानव्यात लपायच्या
म्हणून किराणा व्यापारी
पाहिला, भेटला की सारंं आठवत
आणा, दोन आणा चार आण्याच्या
उधारीच पण मोठं कौतुक उरात दाटत
ती आमची बालपणीची पत
वडिलधाऱ्यांच्या नावावर तग धरायची
आणि कधी कधी फुकटच
एखादं दुसरी गोळी सहज मिळायची
ती बिडी, ती काडी सारं सारं
मला खूप मोठं सुख द्यायची
कारण चार चौघात माझी पत
मला मोठेपणाचा मान द्यायची...!!
