भूक
भूक
हाताला ना उरले काम
आता फक्त आराम
पोटासाठी व्हावे लागले
नामुष्कीचे गुलाम
एका भाकरीपायी
घडते आहे वणवण
घालमेेेल जिवाची
जळविते तन मन
रिकामे पोट नाही
बसू देत स्वस्थ
भूकेपायी नको पहाया
संसाराचा अस्त
भिरभिर नजर पाहते
ओळख एखादी जूनी
तहानलेला देहासाठी
मिळेल का हो पाणी
