STORYMIRROR

Kanchan Kamble

Inspirational

2  

Kanchan Kamble

Inspirational

बहर

बहर

2 mins
14K


जगण्याला बहर आला

मनाला पालवी फुटली

मातीतून माणसं ऊगवली

तडा गेलेली मनं मी लीपली

तडकलेल्या भिंतींना

दिलं सेणामातीच लिपटनं

सुगंधात मनं रमल असं

भविष्याच्या नक्षीच केलं रेखाटन

वळणा वळणांवर दु:खांचे डोंगर

दु:खितांना घास भरवायचे आहे

पुढेपुढे धावत जगतांनाही 

दु:खितांना जीव लावायचाआहे

कुठे पहाड कुठे दरी

सपाटीकरणाचा सपाटा नको

जीवनात सौंदर्य भरू

कुठलाही कुणाशी घातपात नको

शस्ञापेक्षाही शब्दच शस्त्र

उध्वस्त ना हो कुणाचे जीवन

सहज भाव ठेऊ मनात 

मिळेल सर्वांना सन्मानांचे जीवन

टनक झालेले ढेकुल विरते

सरीत होऊन विलीन असे

वार तर होनारच आहे

त्या शिवाय सख्या ते प्रेमच कसे

नव्या वाटा नवे जीवन

नवेच नवे हे नवे पण

तू हो तनमनाने माझा

सुगंधीत होईल नाते पण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational