STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

2  

Prashant Shinde

Drama

भाऊराया..!

भाऊराया..!

1 min
14.6K


अरे दूर देशी तू

मी पराधीन

अंतर पडले खूप

आठवले लावता धूप


मनात तुला ओवाळले

राखी ही बांधली

अंतराची दुरी

अंतरातच सांधली


सुखी समाधानी रहा

आशीर्वाद देते तुला

सांभाळ परिवाराला

प्रेमांनी कुशीत घेऊन मुला


आठवण तुलाही झाली

डावा डोळा फडफडता मी जाणले

उचकी ठसका लागता

पाण्याचे आत्ताच दोन घोट घेतले


भाऊराया विसरले नाही मी काही

तू ही विसरू नको काही

असले जरी दूर मी अन् दूर तू

अंतरात रे तू माझ्या सदा उरी


गोड बोलाचा गोड घास

घे गोड मानून तू मनात

कशास हवी रे आपणा

गाठ भेट दावण्या रे जनास....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama