STORYMIRROR

Kanchan Kamble

Tragedy Classics Others

3  

Kanchan Kamble

Tragedy Classics Others

'भारत'माता

'भारत'माता

6 mins
28.3K


भारत माता माह्या सपनात आल्ती

काय दशा भौ तिची हो झाल्ती

हिरव लुगडं तिचं जागो जागी फाटलं 

झांपर बी तिच जुनच कळकटलं

आगीचा ताम्बळा आणि हाती होता टेंभा

माह्या लेकरानचं ,मारल्या म्हणे बोंबा 

पोरानच आज म्हणे मले ईथं छळलं

पैशासाठी पाय मले,कसं लोळवलं 

उंच उंच माह्या जमिनीचे टुकड़े

रोजच उडवते पहा,एकमेकाचे मुखड़े

रक्तानी आज झाली लालेलाल

कधी सरल असे,दिवस अन् साल

भारत माता म्हणनारी नाहीत आजकाल खरी

अशापेक्षा मी वांझोटीच होती बरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy