STORYMIRROR

Aarya S

Comedy Fantasy Children

3  

Aarya S

Comedy Fantasy Children

भाज्यांचा राजा

भाज्यांचा राजा

1 min
262

एकदा किनई गम्मत झाली,

भाज्यांची चढाओढ चालू झाली


प्रत्येक भाजी बोलायला लागली,

किती मी श्रेष्ठ दाखवायला लागली


वांग म्हणे "मला एकाच पाय,

भरल्या वांग्याची तुलनाच नाय


माझ्यासारखी मीच आहे आगळी,

कुरकुरीत भेंडीची मज्जा च वेगळी


रंग माझा बघा म्हणतय गाजर,

सलाड मध्ये मीच असतो हजर


मी आहे काकडी हिरवीगार,

माझी कोशिंबीर छानच फार


कांदा म्हणे जरा माझ्याकडे बघा,

कांदा भज्यांची खूपच मजा


सगळ्यात शेवटी उठला बटाटा,

म्हणाला सगळ्यांना देईन धपाटा,


माझीच करतात भजी आणि भाजी,

सगळ्यातच मला घालते आजी


बाळ पण जेवायला होतो राजी,

जेंव्हा पानात बटाट्याची भाजी


ऐकून म्हणाल्या सगळ्या भाज्या,

आमचा सगळ्यांचा बटाटाच राजा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy