बापू
बापू
बापू सर्वांसाठी
त्यागात तू जळला
स्वातंत्र्याची भेट देऊन
दुःखी आसवात मेला
अर्ध अंग उघड राहून
चरखा सर्वांसाठी चालविला
हाता हाताला काम मिळावे
आत्मनिर्भरतेसाठी लढला
सत्याग्रहाची मशाल घेऊन
जगाला प्रकाश दिला
उपोषण व खळतर जीवन
ही शिदोरी देऊन गेला
इंग्रजांची गुलामगिरी
भ्याली तुझ्या दंड्याला
पण देशबांधवांची अक्कल
का बळी पडली दंगलीला
बापू तूझ्या दूरदृष्टी पुढे
चष्म्याचा नंबर कळला नाही
सत्तेची लालची लेकरं
तुला कधी समजली नाही
मिठासाठी पदयात्रा
मार्ग कुणास गवसला नाही
तुझ्या मनातील भावनांना
आजही कुणाला कळला नाही
