STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

बापु

बापु

1 min
14.1K


२आॅक्टोबर या दिनी जयंती

म. गांधी नामक महान नेत्याची.....

पोरबंदर गाव ज्यांचे

वाहू बापूंना माला प्रेमाची....


भारताच्या स्वातंत्र्यासाठी

ज्यांनी आयुष्य वेचले

ते स्वच्छतेचे, अहिंसेचे भोक्ते

या बापूजींना नमन आपले....


इंग्रजांविरूद्ध लढा दिला

अनेक मार्गांनी त्यांनी

सत्याग्रहाने इंंग्रजांना नमविले

आपल्याच महात्मा बापूजींनी..


स्वदेशीचा, स्वावलंबनाचा

स्विकार केला बापूजींनी

अहिंसा, सत्याग्रह, तत्वज्ञान

नजराणा दिला या जीवनी...


सूतकताई, गरजेपूर्ती वस्त्र

घालवले जीवन आश्रमातुनी

आदर्श घेऊया आज आपण

महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतूनी...


बापूजींच्या भाषणातून

शिकवण ऐक्याची, अहिंसेची

अन्यायाविरूद्ध लढा पुकारला

चळवळ असहकारतेची....


नमन माझे या बापूंना

जयांनी स्वार्थाला विरोध केला

समाजहितवादी कार्याचा

बापूजींनी पाठपुरावा केला....


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from Vasudha Naik

Similar marathi poem from Inspirational