बालपणाची मैत्री...
बालपणाची मैत्री...
एक अबोल अंतर
बालपणाचे
बोलत बोलत पार करताना
कळले नाही कसे सरले
तुझ्या मैत्रीत झुरताना.
ते एकमेकांचे बोबडे बोल
सारे वेडे खेळ अनमोल
कधी शाळा सुटते अन्
पळण्याचासाठी आतुरलेला तो टोल
बालपणीच्या आठवणी खूप खोल
ना लावे कुणी त्यांचे मोल.
नव्हती कशाची जाण तरी
मने निस्वार्थ जुळून गेली
हसत खेळत चिडत रडत
बालपणाची मैत्री जीव लावून गेली..
