बालपण
बालपण
चिखल पाणी खेळत
त्या मातीतच लोळणे
असते किती भारी जग
ते म्हणजेच बालपण
रमत गमत चालणे
कारणं सांगून अभ्यास टाळणे
खोडी करण्यात रमेे मन
गोड भातुकलीचा खेळ
नसे त्याला काळ वेळ
कल्पभावनेचे मन
ते म्हणजेच बालपण
आजीची रात्रीची गोष्ट
ऐकायला वाटे मस्त
प्रत्येक वाक्यात विचारणे का पण ?
ते म्हणजेच बालपण
मन होते वेडे
कल्पनेच्या दुनियेत
काय राहते समजुतपण माहीत नव्हते
ते म्हणजेच बालपण.
