आजीच्या गोष्टी
आजीच्या गोष्टी
रोज गोळा होऊनी
मुलांची धम्माल होई
आजी भोवतीचा गराडा
गोष्टी ऐकण्यास येई
एका एका गोष्टीतून
आजी ज्ञान देई
अनुभवाच्या खजिन्यातून
आम्हा शिकवण देई
राजा राणीच्या विश्वात
आम्हा सर्वांना नेई
चुकीच्या वागणुकीला
शिक्षेची जोड देई
कधीही न संपणाऱ्या
रोचक या गोष्टी
नैतिकता समजावणार
कथेतल्या प्राण्यांच्या भेटी
शहाणपणाचे धडे
मिळे या कथेतून
कधीही न विसरणारे
आजीच्या गोष्टीतून
