बालपण
बालपण
1 min
223
बालपणातील खेळ खेळावे
सख्यांना ही खूपच चिडवावे
एकमेकांचा हात धरून
नदीकाठी गप्पागोष्टी करावे
आईकडे हट्ट करावे
बाबांची चिमुकली बनावे
भावंडांशी हुज्जत घालावे
आजोबांकडे गोड गोड खावे
गेलेले दिवस परत यावे
खूप खूप बागडावे
गेलेले क्षण परत अनुभवावे
बेधुंद जीवन मनसोक्त जगावे
सांजवेळी बसुनी पहावे
चंद्र-तारे उगाच निरखावे
अंधारातून घाबरत जावे
असे हे बालपण परत परत यावे
