STORYMIRROR

PRIYA KAULWAR

Fantasy Inspirational Children

3  

PRIYA KAULWAR

Fantasy Inspirational Children

डोळ्यात खुपणार का ?

डोळ्यात खुपणार का ?

1 min
240

मुकी कळीस आईस बोलते

उद्या मी संपणार का ?

आजचा दिवस माझा आहे

तो ही डोळ्यात खुपणार का ?


नको आणू नयनी पाणी

दुभंगू नको माय धरणी

उद्या मी राहणार न राहणार

बिलगू तुला दे ग याच क्षणी

अग या कोवळ्या कोंबास

उदया कात्री लागणार का ?

आजचा दिवस माझा आहे

तो ही डोळ्यात खुपणार का ?


जग पाहण्यास मला बंदी

ऐकले आहे ते पेढे कंदी

नकोच मला ती नात्यांची सभा

ज्यात भरडली जाते द्रौपदी

प्रकाशाची स्वप्ने पाहणारा

काळोखही उद्या सरणार का ?

आजचा दिवस माझा आहे

तो ही डोळ्यात खुपणार का ?


नकोच माते मज फुलने

फांद्यावरती तुझ्या झुलणे

गंध पसरता दुरवरी ग

भ्रमरांचे अंग चटीला येणे

ज्यात मी सुरक्षीत आहे

रेशमी वेष्टन नसणार का ?

आजचा दिवस माझा आहे

तो ही डोळ्यात खुपणार का ?


तुझे प्रेम मला समजते

पण निष्ठुर जगा न उमगते

ज्यामुळे सजते हे घरकुल

त्यालाच मग का लाथाडते

'आई - आई ' म्हणताना ग

उद्या आभाळ फाटणार का ?

आजचा दिवस माझा आहे

तो ही डोळ्यात खुपणार का ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy