STORYMIRROR

PRIYA KAULWAR

Others

3  

PRIYA KAULWAR

Others

ठिणगी

ठिणगी

1 min
242

सृजनशीलतेची जिला देणगी

जग पाहण्या तिलाच परवानगी

धगधगत्या अग्निकुंडातून

पेटून उठेल एकदा ठिणगी


जिला समजता तुम्ही कोळसा

तिच दाखवेल आता आरसा

हिर्‍याची लकाकी जाणवेल

हृदयात डोकावून बघ माणसा


काळोखालाही चित करेल

मिळता तिला जीवनप्रकाश

स्वसामर्थ्याच्या गरूडझेपेने

धरेवर स्थापेल नवीण आकाश


स्वप्नांच्या जिच्या चुराडा करून

उडू पाहतोस ना तु अंबरी

तिच्या वेदनांचा समजून हुंकार

घेऊ दे तिला रे उंच भरारी


सीता, गीता नाही ती द्रौपदी

स्वसंरक्षणासाठी हात पसरणारी

दुर्गा, काली आहे ती रणरागिनी

अन्यायाला झुगारून लावणारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन