झाशीची राणी
झाशीची राणी
1 min
267
खूप मोठी मर्दानी तू झाशीची राणी
ह्या मातीतली वाघीण पाजलं ब्रिटिशाला पाणी !
मर-मर मरली देशासाठी झडली भू रणी
लढा हा गुंजला देशभरात तरी संपेल ना तुझी कहानी!!
हर-हर महादेवाचा नारा गुंंजला कानो कानी
घोड्यावरती स्वार झाली पाठी मुलगा बांधूनी !!
ब्रिटिशाच्या होठावरती "लक्ष्मीबाईची वाणी"
इतिहासाच्या पानावरती नाव लिहिले सोण्याणी !!
अमर क्रांति उरली सारी वंदीले भारतवासनी
झाशीवरती सदैव "ध्वज" फडकत राहील मां राणी !!
