डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
होते बहुजनांचे आधार
राज्यघटनेचे शिल्पकार
कायदा भिमाचा भारतभर
अशी किर्ती त्यांची जगभर
भारताचा सुपुत्र महान खरोखर
संघर्षात जीवन आयुष्यभर
मानवासाठी जगले खंबीर
भारताचे तज्ज्ञ बुद्धिवान
शिक्षणाने केले प्रज्ञावान
लढा त्यांचा पाण्यासाठी
बहुजनांच्या शिक्षणासाठी
सार्या विश्वाला अभिमान
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महान
जनसागर उसळ्तो दीक्षाभूमीवर
आठवण 14एप्रिलची दादर सागर किनार्यावर
आठवण इतिहासाच्या पानापानावर
बहुजनांच्या ठसले मनामनावर
हा सण म्हणून भारतभर
आनंदे नाचती लहान थोर
दरवर्षी ही परंपरा देशभर
खेड्यापाड्यात अजरामर
त्यांची प्रेरणा शिक्षणासाठी
निरक्षराला साक्षर करण्यासाठी
शिका,संघटीत व्हा संघर्ष करा
अन्याय,अत्याचार दूर करा
पशूसमान वागणे बंद व्हावे
माणसाने,माणसाला माणूस समजावे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
केला गोरगरीबांचा उद्धार
न्याय,समता,बंधूता,भारतात
बाबासाहेब त्याचे प्रेरणास्रोत
वाचनाची आवड मनापासून
ध्यास ज्ञान घेण्याचा त्यातून
पुस्तके होती त्यांचा परिवार
माई रमा होती त्यांच्या बरोबर
हक्क जगण्याचा मानवाला
जीवन वाहिले भारत मातेला
नागपूरला धर्मांतर करून
बौद्ध अनुयायी धर्म परिवर्तन
