बालपण
बालपण
वेळ ही बालपण हिरावून घेते
सगळ्यांमध्ये शेवटपर्यंत असते बालपण
वयाची संख्या फक्त वाढत जाते
वयामुळे तणावामुळे येते सूनेपन...
आठवण येते शाळेतली
कंपास बॉक्स मधल्या भिंगाची
दिसला कागद की जाळ
वाट बघणाऱ्या मैत्रनीची...
आठवण येते लेमन गोळयांची
मैत्रीमधल्या निरागस मनाची
फक्त दोन बोटे जोडून होणाऱ्या
आयुष्यभर न तुटणाऱ्या मैत्रीची...
आठवण येते त्या आईची
शाळेत पाठवते म्हणून रडलेले
आठवण येते बर्फाचा गोळ्याची
आठवण येते कैर्या चिंचा पाडलेले..
आता वाटतेय उगीच मोठे झालो
लहानपणच मस्त होते
नको वाटतेय विचारांचे ओझे
त्याच आठवणीत हरवून जाते....
