STORYMIRROR

Karishma Dongare

Classics Inspirational

3  

Karishma Dongare

Classics Inspirational

आई

आई

1 min
190

आई कशी असते

कधीच कळले नाही

कशी दिसत असेल

हे सुध्दा माहीत नाही....


आई म्हणे खुप जीव लावते

फक्त ऐकून आहे

तीची माया किती असते

हे कधीच समजले नाही.....


आईबद्दल फक्त

बघितले ऐकले आहे

पण, कधीच अजूनही

तिचा स्पर्श माहीत नाही.....


किती नशीबवान असतात

ज्यांना आई असते

नाही कळणार कधी तुम्हाला

आईविना पोर

किती एकटे पोरके असते....


आमच्या नशिबात फक्त

दुःखाचं वाळवंट आहे

मायेचा ओलावा कसला

हे काही माहीत नाही

हे काही माहीत नाही.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics