STORYMIRROR

Karishma Dongare

Inspirational Others

3  

Karishma Dongare

Inspirational Others

आठवतो का जालियनवाला बाग

आठवतो का जालियनवाला बाग

1 min
208

 आजही आठवण करून देतो

जालियनवाला बाग हत्याकांड

इंकलाब चा नारा सुरूच होता

आनंदाच्या चेहऱ्यांची गर्दी होती

चिमुकल्यांच मांडलेले खेळ होते....

या हसऱ्या चेहऱ्यांच्या गर्दित

गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला

रक्ताच्या थारोळ्या उडू लागल्या....

बंदिस्त बागेमध्ये अनेक

निरपराध जीव गमावले

रक्ताने माखलेली ती माती

प्रत्येक दृश्य जीवंत करीत होती....

१६५० गोळ्यांचा पाऊस पाडला

यातच इंग्रजांचा पुरुशिपणा होता

अरे... जन्म घेऊन ६ आठवडे झाले

त्या बाळालाही यांच्या क्रूरतेने सोडले नाही....

शरीरातील रक्त आणि डोळ्यातील पाणी

याने ती माती भिजून गेली होती

शहीद होणारा प्रत्येक हिंदुस्थानी

भारत मातेच्या डोळ्यात 

एक स्वतंत्र होण्याची आग पेटून गेला....

कित्तेक यातनेने भरलेली

ती विहीर आजही रडत आहे

प्रत्येक खून ते घडलेले 

आठवण करून देत आहे...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational