STORYMIRROR

Karishma Dongare

Inspirational

3  

Karishma Dongare

Inspirational

कलाकार

कलाकार

1 min
738

नृत्य, गायन, अभिनय

हे सारे रंगमंच होतात

दुःख,वेदना,संकटे

कलाकार होऊन जातात..


कलाकार जीव ओतून

प्रत्येक कला साकारतो

महिन्याचे अपार कष्ट

मिनिटात दाखऊन जातो...


रंगमंच नेहमी कलाकारांचा

एक मंदिरच होऊन जाते

त्याच मंदिरातील श्रद्धेची

त्याला जिवंत मूर्ती बनवते...


कला सादर करीत करीत

स्वतःमधला मी विसरतो

दुनियेच्या आनंदासाठी

जीवनातले दुःख मागे टाकतो...


नकळत कधी हात धरते

तीच कला आणि लेखणी

करुन टाक स्वतःला वेक्त

लीही तू, कला कर देखणी....


कलेच्या सुंदर विश्वात

विसर पडतो दुःखांचा

पोट भरण्यासाठी जगात

स्वीकार करतो कलेचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational