STORYMIRROR

Karishma Dongare

Classics Inspirational

3  

Karishma Dongare

Classics Inspirational

स्री मातीचा पुतळा

स्री मातीचा पुतळा

1 min
178

स्त्री कसली आजची

तिचं शील जातियतेवर जळतेय

अनेक द्रौपदीचे वस्त्रहरण

आजच्या घडीला होतय


पांडवासारखे तुम्ही बसु नका

डोळ्यावरची पट्टी बघा काढून

हा पराजित ईतिहास

टाका तुम्हीच आता मोडून


स्त्रीचं जीवन म्हणजे

आहे एक मातीचा पुतळा

ज्याला जसा हवा तसा घडवावा

कुठेतरी याला बसावा आळा


स्री म्हणजे एक वस्तु

तिचा तुम्ही सौदा करु नका

नेहमी प्रतीज्ञा करीत असता

प्रतिज्ञेशी बेईमानी करू नका


स्त्रीचं आयुष्य म्हणजे

एक उजाड वाळवंट

तीला मानाचं खतपाणी देऊन

फुलबागेसारखे जिवनात आनंद भरू


अपमान पावलो पावली देता

विसरावे अभद्र भूतकाळाला

आधारची गरज आहे

तिच्या बेचैन असणाऱ्या स्वाशाला



विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Classics