बालकाव्य
बालकाव्य
गोल गोल इडली
सांबरात जावून बुडाली
छोटूने केले तिचे तुकडे तुकडे
पळते मग इकडे तिकडे
छोटूने ते चमच्यात घेतले
चमच्यात घेवून तोंडात घातले
इडली आहे मस्त
छोटूने केली फस्त
तृप्त झाला छोटू
पोट झाले त्याचे मोटू....
