STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

बालकाव्य

बालकाव्य

1 min
370


*रंगतदार कबड्डी*


शाळेच्या मुलींची इथे

रंगली छक्कास कबड्डी

हाताची करुनी साखळी

आऊट केला एक गडी


लाल मातीच्या मैदानी

कबड्डीला चढला रंग

चढाई करता प्रतिस्पर्धी

आऊट करण्या सारे दंग


प्रतिस्पर्धीच्या पकडीतून

बचाव करण्याची गडबड

प्रतिस्पर्धी गड्याला इथे

पकडण्याची झाली धडपड


प्रतिस्पर्धीने चढाई करता

मोका साधून गाठला पल्ला

पकड करता घट्ट एकीने

साखळी करुन चढवला हल्ला


सरावाने आज आली

कबड्डी जिंकण्याची वेळ

सांघिक भावना वाढवितो

कबड्डीचा मैदानी खेळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational