Prashant Shinde

Fantasy

2  

Prashant Shinde

Fantasy

अतृप्त

अतृप्त

1 min
6.9K


आंघोळ करताना

रोज भिजलं तरी

फक्त पावसातच होता येतं चिंब

पुढचं काही सुचत नाही

टिंब टिंब टिंब


टिंब टिंब टिंब टीबीक

आवाज थेंबा थेंबाचा

खरच हा आवाजही

मज वाटतो हौसेचा


वेगळाच तोरा

दरवर्षी पावसाचा

जणू पडतो असा

की असावा नवसाचा


कधी रप रप कधी झप झप

कधी वरंधार कधी चिर चिर

कधी ढग फुटी तर कधी गारपीट


सारं कस बेभरोशाच

तरी पण अतूट प्रेमाचं

अन मोठ्या जोमाचं

कोणत्याही प्रकारात

चिंब चिंब करणार

आणि मोठं सुख देणार....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy