अरे फितुरांनो !!
अरे फितुरांनो !!
. अरे फितुरांनो !!
अरे फितुरांनो, फितुरी कुणाशी?
जन्मा घातलेल्या मायच्या कुसीशी➿
घरे तुम्ही त्यांची, उद्धवस्त केली
पोटात कळी घेऊनी सून विधवा झाली
कसे समजावे त्या सैनिकाचे पित्याशी ?
घरात न उरला, आधार कुणाचा
जीव तळमळतो, जळतो उन्हाचा
तेला विना विजल्यात वाती...
सोडून बहिणीशी अर्ध्यात तो गेला
पिता ही लागला चांदनी बुडाला
हंबरडा फोडूनी माय तडफडून मेली..
चिमुकला रडतो धरूनी उराशी
विरहात वेडी माय दूधाची
शोधावी कुठे तिने सावली पतिची?
तळहातावरती प्राणं जवानांचे
छातीवर झेलती घाव तुफानांचे
शत्रुत्व त्यांचे न कोणत्याही रंगाशी..
अशी कोणती शिकवण तुम्हाला
रक्तात बुडूनी मोक्ष मिळतो का कुणाला?
अरे माणूस धर्मासाठी नव्हे धर्म माणसाशी !!
