अहर्निशी सदा परमार्थ करावा
अहर्निशी सदा परमार्थ करावा
अहर्निशी सदा परमार्थ करावा | पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥
आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥
तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥
आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥
शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥
