Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

BABAJI HULE

Abstract Others

3  

BABAJI HULE

Abstract Others

अभिमान आहे मला आंदोलनजीवी असल्याचा

अभिमान आहे मला आंदोलनजीवी असल्याचा

1 min
166


अभिमान आहे मला मी भारतीय असल्याचा 

साठ करोड श्रमजीवी या भारतीय संस्कृतीचा I

अभिमान आहे मला आंदोलनजीवी असल्याचा 

स्वाभिमान आहे मला माझ्या हिंदुस्थानी मातीचा  II

ज्या देशाने स्वातंत्र्यच आंदोलनाने मिळवले 

दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशाबाहेर घालविले I

आपल्या हक्कांसाठी छातीवर गोळ्या झेलणारे ही पहिलेस्वातंत्र्यवीरांनी आपले अनमोल आयुष्याचे बलिदान केले II

१८५७ चा मंगल पांडेचा उठाव ही इतिहासात अभ्यासला 

१८८५ चे भारतीय राष्टीय कॉंग्रेसच्या स्थापनेचेही आंदोलनही वाचले I

१९०५ चे बंगालचे विभाजनाचे अंदोलन ऐकले 

१९१६ चे होमरूल आंदोलन हीअनुभवले II

१९१९-२० चे जालियनवाला हत्याकांड आणि खिलाफत आंदोलन 

१९२० चे महात्मा गांधींची असहकार चळवळीची सुरवात I

१९२८ चे सायमन गो बँक लाला लजपत रायचे अंदोलन 

१९२८ च सरदार वल्लभ पटेलांचा बारडोली सत्याग्रह II

१९२९ ला भगतसिंगचे लाहोर षड्यंत्राविरुद्ध बॉम्ब फेकणे 

१९३० चे महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह आणि दांडी यात्रा I

१९४२ चे सुभाष चंद्र बोसांचे आझाद हिंद सेनेचं फौज आंदोलन 

१९४२ चे महात्मा गांधीजींचे भारत छोडो आंदोलन II

हेच ते सर्व आंदोलनजीवी स्वातंत्र्यपुर्व काळातले 

याचीही ओळख एक परजीवी होती का ?

आपल्याच विचारांची धारा प्रस्तावित करणारे 

न्याय हक्कांची पायमल्ली होते तेव्हा लढणारे II

याला काय म्हणावें दंगाजीवी की आंदोलनजीवी ?

कोणी काहीही म्हणोत हे जर आहेत आंदोलनजीवी --

तर अभिमान आहे मला आंदोलनजीवी असण्याचा 

स्वाभिमान आहे मला माझ्या हिंदुस्थानी मातीचा II


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract