STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही

1 min
1.2K


*आयुष्यावर बोलू काही*


आयुष्याच्या पानावरचे

तुम्हीच नवे ते दोस्त काही

चला गड्यांनो, पुन्हा एकदा

आयुष्यावर बोलू काही


सोनेरी क्षणांनी नटले

आयुष्याचे प्रत्येक अंग

कळले ज्यांना जगणे त्यांनी

आयुष्याचे लुटले रंग


खंत ,निराशा बाजूस सारुन

अपेक्षांना देवूनी फाटा

जोडीत गेले नात्यांना जे

मिळाल्या त्यांना जीवनवाटा


रिकामे हात ते येता-जाता

का करावा मग उगीच त्रागा

बंध रेशमी प्रेमाचे गुंफून

नात्यांना बांधावा प्रेमळ धागा


माणुसकीचा धर्म जपण्याची

वेळ अजूनही गेली नाही

क्षणाक्षणांचा हिशोब ठेवूनी

आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational