STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Inspirational

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Inspirational

आयुष्य ओझरत

आयुष्य ओझरत

1 min
501


**

ओझरत आयुष्य म्हणजे एक यात्रा...


ती यात्रा म्हणजे कुटुंबाची भरवलेली जत्रा....


ज्यात जो व्यक्तिगत प्रामाणिक जीवन जगत असतो..


तोच खरा ओसरत्या वयात

खूप सुखी दिसतो..


ते तर फक्त समधानाच्या शोधात असतात..


आणि त्यांची मुल स्वताच्या सुखापोटी त्यांच्या समाधानालाच वाटी लावतात...


त्यांचं आयुष्य फक्त एक ओझरणारा वारा...


जसा वाहे आपल्या जीवनी प्रेमाचा झरा...


निमुळते असतात त्यांच्या जीवनाचे क्षण..


कधी आयुष्यात कोणाच घेतल हो त्यांनी उसन...


जिवनातील निघून गेलेल्या वर्षांच

त्यांच्या आयुष्यावर ओझ नसत...

ओझ ते फक्त त्यांच्या मनावर अपेक्षांचं असत..


ज्या पूर्ण करण हे त्यांच्या मुलांचं कर्तव्य असत....


आपल्या रक्ताच्या नात्यात त्यांना ते दिसत..


म्हणूनच तर म्हातारपणात

त्यांचं आयुष्य ते फसत......

त्यांचं आयुष्य ते फसत......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational