आठवण!
आठवण!
दूर देशाचा पावणा
इथे आलो रानीवनी
पोर बाळ बाया बापडे
मागे काढतात आठवणी
भाकर तुकडा लेकरा
काकण वाजवून देते मालकीण
मी प्रेम पाहतो तिचे इथे
भाकरी तिच्या नावाची भाजून
शेक पोटाला हाताला
चटका तनाला मनाला
धग लागते तव्याला
भाकरी एक भाजायाला
सरपण घातले चुलीत
सारे जीवन ओवाळून
आठवण येते घराची
पोटात कळवळून
आतल्या आत आशा
करपते भाकरी वाणी
काय सांगावे कोणाला
आमच्या वर्दीची कहाणी....!!!
