आठवण
आठवण
8/1/2011 रोजी हा फोटो फेस बुक वर अपलोड केला आज सात वर्षे झाली म्हणून त्या दिवसांची आठवण ताजी झाली....!
काय ते दिवस होते
सोनेरी सोनेरी
जिद्दीचे ,स्वप्नांचे
आणि हुरळून टाकणारे
आता मागे वळून पाहताना
सारीपाट सारा उधळालाय
तरी पण सोंगट्या मांडणे आणि
नवा डाव मांडणे सोडले नाही
रोज नवीन आखणी
नवीन मनसुबे
नवीन स्वप्ने
अविरत धडपड जगण्याची
आनंद आनंदच आहे
फरक काही पडत नाही
प्रगतीच्या नावा खाली
चालणे काही थांबत नाही
हरकत नाही
कसेही दिवस आले तरी
आता भय कोणतेच नाही
आणि तक्रार ही काही नाही
आजही दिवस उगवतो
रोज नवे स्वप्न घेऊन
मावळताना नित्य
जातो नवी ऊर्जा देऊन
आता खंत काही नाही
परमेश्वराने खूप दिलय
मागणे काही राहिले नाही
म्हणून तर दुःख काही उरले नाही
ती ही सुखी ,मी ही सुखी
मुले ही सुखी, आप्त ही सुखी
बहुतेक यालाच जीवन म्हणतात
म्हणून तर सारे आनंदी असतात....!!!
