आठवण
आठवण
जेव्हा मन कधी उदास होते
आठवणींच्या राज्यात हरवुन जाते
कधी जीवनात येती दुःखाचे क्षण
मनात त्या क्षणांचे आठवणींचे वण
साथीला होते सगे सोबती
आठवणींच्या विश्वात तेच लाभती
कधी मायेचा हात, कधी संकटी साथ
आठवणींच्या आरशात सगळेच जातो पहात
आठवणींनी कधी उर भरुन येते
वर्तमान प्रसंग, गत आठवण करून देते
आठवणींचे जीवनात किती आहे मोल
कुणासाठी व्यर्थ अन कुणासाठी अनमोल
प्रत्येकाच्या जीवनात आहे सुख दुःखाचे समर
जग जरी मर्त्य पण आठवणी अमर
आठवणींने जड किंवा हलके होते मन
मानवाच्या जीवनी आहे आठवणींचे धन
