आशीर्वाद
आशीर्वाद
साई राम साई श्याम बोले हे मन
तुझियाच नामात डोले हे तन
आवरू कसे मी रेे अवखळ हे मन
तुझियाच नादात डोले हे तन ।।धृ।।
आरती मनातली गाभाऱ्यात निनादली
ज्योत ही ह्रदयातली अंतरी प्रकाशली
गंधा सुगंधा ने दरवळले हे मन
तुझियाच नादात डोले हे तन ।।१।।
भाव हा मनातला चंदनात वाहिला
त्रिगुणांचा दोष मनातला कपूराने जाळीला
तुझियाच ध्यानात रमले हे मन
तुझियाच नादात डोले हे तन ।।२।।
देव हा मनातला माणसात पाहिला
खेळ हा जीवनातला दैवाने दाविला
परतूनी जन्म मागितले हे तन
फेडायला पांग तळमळले हे मन ।।३।।
।।सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय।।
