आशाढी सरी
आशाढी सरी
पूर्वी सरी वर सरी येत
आषाढी कार्तिकीच्या भारी,
शेतकऱ्यांना लगबग सुटे
बियां पेरणीसाठी शेतावरी.
मुसळधार पाऊस पडे
तोऱ्यात तेव्हा दिन रात ,
अल्हाददायक मनाला वाटे
गारगार वारा शिरला की अंगात.
पावसाच्या थेंबात नव्हते
कधीच आळस, कंटाळा, थकवा,
सतत टपकत राहून राहून
सगळ्यांच्या मनात आणि गोडवा.
सिमेंट, काँक्रीटचे रस्ते
कोसो दूर होते गावापासून,
गावच्या गल्लीतून चालताना
पडल़ोत कधी पाय घसरून.
आजही सर्वाच्या मनामनात आहेत
घर करून त्या आषाढ सरी,
आठवणींना उजाळा देण्यासाठी
येत नाहीत पैलेसारख्या सरी वर सरी.
