आशा
आशा
सोबतीला साथ नव्हती, सावलीला हाक नव्हती.
वाट मात्र पाहत होतो, एकट्याचीच जात होती.
चालण्यास वाट नव्हती, बोलण्यास जीभ नव्हती.
विचार मात्र करत होतो, बुद्धी फक्त प्राप्त होती.
आडोश्याला छाया नव्हती, सुगंधी ती पुष्प नव्हती.
श्वास मात्र घेत होतो, श्वसन फक्त चित्त होती.
करावया काम नव्हती, झुकन्या साठी मान नव्हती.
जगत मात्र होतो तरी, लाचारी एकाकी सोबत होती.
डाव पूर्ण करण्या वेळ नव्हती, आता थांबायाची इच्छा नव्हती.
प्रयत्न मात्र मी करत होतो, जिंकण्याची फक्त ती आशा होती.
