STORYMIRROR

Sunil Khaladkar

Drama Tragedy

3  

Sunil Khaladkar

Drama Tragedy

आपली नाती, आपली माणसं

आपली नाती, आपली माणसं

1 min
613

विविध रंगाच्या फुलांनी,

आज मी सजलो होतो...

खेळ संपला जीवनाचा, म्हणून 

चादर घेऊन निजलो होतो..


लग्नानंतर मला पहायला,

खूप जमली होती गर्दी...

मित्र आणि सोयऱ्यांनी,

घातली होती सफेद वर्दी....


घरातील माझ्या सर्वजण ,

धाय मोकळून रडत होते....

डोळ्यातील त्यांचे अश्रू ही,

माझ्या शरीरावर पडत होते....


माझी इचछा असतानाही,

मला उठता येत नव्हते...

माझ्या प्रियजनांचे अश्रु,

उठून हाताने पुसता येत नव्हते.....


पैसा कमवताना मी आपल्यांसाठी,

कधी ही दिला नव्हता वेळ..

अन आज ते जमले माझ्यासाठी,

पाहिला नियतीचा खेळ...


स्वप्न मोडताच मुलांना पाहून,

मी घट्ट मारली मिठी....

अन् मनाशी ठरवलं की आजपासून,

मी वेळ देईल प्रियजनांसाठी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama