आनंदाचा सण दिवाळी
आनंदाचा सण दिवाळी
अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया
पाच दिवस दिवाळी सण साजरा करूया
घरापुढे कंदील, पणत्या आणि दिव्यांची आरास
प्रत्येकाच्या मनाचा वाढवी उल्हास
सप्तरंगी रांगोळ्यांनी सजले जाते प्रत्येक दार
सुंदर पानाफुलांचे बांधले जातात बंधनवार
अश्विन कृष्ण द्वादशीला असतो वसुबारस
गाई गुरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस
दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशी
धन्वंतरीदेवाची पूजा केली जाते या दिवशी
सुगंधी तेल आणि सुवासिक उटण्यानी अभ्यंगस्नान
नरकचतुर्दशीच्या दिवशी असतो लक्ष्मीपूजनाचा मान
साडे तीन मुहूर्तांपैकी एक दिवाळी पाडवा
देवीरूपी बायको ओवाळते शिवरूपी नवऱ्याला
भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून बहीण ओवाळते भावाला
भाऊबीज हा दिवस असे दिवाळीचा शेवटचा
अशी असे महती दिवाळी या सणाची
लहान मोठे करती देवाणघेवाण आनंदाची
लक्ष्मीच्या पावलांनी येते सुख समृद्धी दारी
आरोग्य धनसंपदा येवो घरोघरी
