आनंद
आनंद
चंद्र प्रकाश वाटतो मज किती मंद
मानवी मनास असावा आनंदाचा छंद
गर्वानेही होते छाती जेव्हा रुंद
जेव्हा होतो मनास मनस्वी आनंद
जीवनात येते जेव्हा आनंदाचे भरते
दु:ख कितीही असो ते त्यापुढे हरते
संकटे कितीही आली जीवनात मोठी
आनंदाने वाटतात ती आपणास छोटी
आनंदाचा घुमूद्या सर्वत्र शंखनाद
आनंदाने घालुया एकमेकास साद
आनंदाची किमया आहे किती भारी
आनंदाने नाचती नर आणि नारी
आनंदाचे अश्रू जेव्हा डोळ्यामधुन येती
आनंदाच्या क्षणी जुळती मना मनांची नाती
दुख विसरण्यासाठी आनंद एकच हल
सर्वत्र पसरवित जावा आनंद परिमल
