STORYMIRROR

Aarya S

Comedy Fantasy Children

2  

Aarya S

Comedy Fantasy Children

आंबट द्राक्षे

आंबट द्राक्षे

1 min
167

भुकेलेले कोल्होबा

फिरत होते रानात,

फिरता फिरता पोहोचले

द्राक्षाच्या वनात.


द्राक्षाचे घड सगळीकडे पाहिले

कोल्होबांच्या तोंडाला पाणी सुटले,

पाहिले तर कुणी जवळपास नाही

म्हणाले पोटभर द्राक्षच खावी.


मारू लागले उड्या

खाण्यासाठी द्राक्ष,

साध्य नाही झाले

तरी त्यांचे लक्ष्य. 


उड्या मारून बिचारे

कोल्होबा पडले,

तरी ही द्राक्ष

हाती नाही लागले. 


मला नको द्राक्ष

आंबट आहेत भारी,

हात हलवत कोल्होबा

गेले आपुल्या घरी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy