आमच्या गावच फेमस हाय लय मटन ।
आमच्या गावच फेमस हाय लय मटन ।
गावच्या नदीत चालते जनावर काटणं।
आमच्या गावचं फेमस हाय लय मटण।
खाटक्याच्या हाती धार असे
धारीच्या खाली ढोर असे
कमिल्यात जाऊन करतात त्याचं कटन
आमच्या गावचं फेमस हाय लय मटण।
घरी आणून ते शिजायला टाकू
बनवायला तिखट मसाला वाटू
तेलाच्या फोडणीत देतो त्याला टाकून
वाट पाहतो कड येण्याची उतून
आमच्या गावचं फेमस हाय लय मटण।
आईच्या हातचं मटण लय चवदार
रस्साही त्याचा लय तर्रीदार
भाकरीचा काला मोडून खातात सटुन
आमच्या गावचं फेमस हाय लय मटण।
