आमची म्याऊ
आमची म्याऊ
किती साजरी गोजिरी
म्याऊ आमची गं बाई
तिचे मोठे मोठे डोळे
कशी टकमका पाही
नाव तिचे काळुबाई
तिला शोभतया भारी
शांत बसेना ती कधी
उड्या घरभर मारी
इटुकली पिटुकली
तरी खोडकर फार
तिला मिळताच संधी
तेव्हा होई ती पसार
तिचा शोध घेता घेता
होती सारेच हैराण
घेण्या हळूच चाहूल
कशी हलविते कान
तिचे म्याऊ म्याऊ गाणे
सदा चालू घरामधी
वाटीभर दूध लागे
कधी मऊ पोळी साधी
लांब तिच्या शेपटीची
चाले कशी वळवळ
म्याऊ आमची लाडाची
हवी आम्हाला जवळ
