आली सर पावसाची
आली सर पावसाची
आली सर पावसाची
पसरली लहर आनंदाची ||
शितल ही धरणी झाली
पावसात चिंब न्हाऊन निघाली ||
नव तृणाची हिरवळ दाटली
बघा चहूकडे कशी ही धरती नटली ||
आली सर पावसाची
नव आशा, चैतन्याची ||
सारी सृष्टी आज खुलली
गालातल्या गालात हसू लागली ||
मृत्तीकेचा गंध पसरला
बळीराजा आज सुखावला ||
इंद्रधनू तो गगनात अवतरला
चातक तो जल बिंदू पिऊन सुखावला ||
पशुपक्षी गाती आज आनंदाची गाणी
नदी,नाले,रस्ते सारीकडे दिसे पाणीच पाणी ||