Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gajanan Pote

Others

4.8  

Gajanan Pote

Others

माझी विठाई

माझी विठाई

1 min
232


जरी उभी कर कटेवर ठेवून पंढरपुरी 

माझी विठू माऊली वसते माझ्या उरी ||

सावळे रूप गोजिरे शोभते विटेवर 

विठाई माझी माया करी साऱ्या लेकरांवर |||

चराचरात वसली आहे माझी माऊली 

दुःखाच्या उन्हात देई सुखाची सावली ||

विठाई माझी कृपेचा सागर 

तिच आहे स्वर्ग सुखाचे आगर ||

ठेवता मस्तक माऊलीच्या चरणांवर 

नष्ट होतील अंतरीचे सारे विकार ||

विठाई माझी आहे चंदनासम 

होई शांत मनाचा दाह घेता तिचे नाम ||

ममतेचा वर्षाव करते माझी विठाई 

अनाथाला सांभाळत असे होऊन आई ||


Rate this content
Log in