Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gajanan Pote

Others

4.0  

Gajanan Pote

Others

अशी होती माझी शाळा

अशी होती माझी शाळा

1 min
208


आनंदाची बाग होती

मित्रांची साथ होती

ज्ञानाची गंगा होती

माझ्या गावची शाळा फार छान होती||


शिक्षकांचा धाक होता

शिकत होतो हसता खेळता

 छडीचा दरारा वेगळाच होता

आदर शिक्षकांचा मनी कायम होता||


गावच्या शाळेत आपुलकी होती

स्पर्धेची भावना मनी नव्हती

पास होण्याचीच समाधानी वृत्ती होती

त्या शाळेतच जुळली निस्वार्थ मैत्रीची नाती||


शाळेत आमचीच चालायची

शिक्षकांची नजर सतत आमच्यावर असायची

ती आम्हाला हवीहवी वाटायची

डेक्स बेंचवर नावे आमची कोरलेली असायची||


गावातल्या शाळेत मज्जा असते न्यारी

जन्म घेते तेथे खरी हुशारी

जगण्याचे सारे धडे ती शिकवणारी 

गावच्या शाळेत शिकली जाते दुनियादारी||


Rate this content
Log in