STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

आली दिवाळी...!

आली दिवाळी...!

1 min
28.3K


आली दिवाळी आली दिवाळी

खायची काय नुसती केळी ?

जीएस्टी ची घोषणा अवेळी

डोकं बडवायची आली पाळी ..!


नित्य नियमाने सायंकाळीं

घरी जाता सौ ओवाळी

पहाते मजला पूर्ण आळी

आता कसली पुरण पोळी ...?


डोक्यावरची सरली जाळी

टक्कलावरती फिरते अळी

गालावरी जरी असली खळी

अंतः करणं माझे दैव पोळी...!


काहीही असले तरी

दिवाळी होते भरजरी

गृहलक्ष्मी कोंड्याचा मांडा करी

म्हणता म्हणता मुखाणे हरी हरी..!


दिवाळी मज अशी यावी वाटते

जेंव्हा गृहलक्ष्मी माझी झोकात नटते

डोळ्यांचे मग पारणे फिटते

तेंव्हा देवा मला तुझे मोल कळते...!


पहाता तीला ऊर भरून येते

क्षणात दुःख दारिद्र्य सरते

तुझ्या आगमनाने मग देवा

दिवाळी आमची आनंदात न्हाहते...!


अशीच दिवाळी सदैव येऊ दे

गृहलक्ष्मी माझी अशीच नटू दे

तुझ्या सानिध्यात देवा

तिला संसार सुखाचा थाटू दे....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational