STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आला श्रावण आला श्रावण

आला श्रावण आला श्रावण

1 min
214

धरित्रीची काहिली तापता , पर्जन्ये अवनी मोहरता

वसुंधरेला खुलविण्यासी , आला श्रावण , आला श्रावण


घननीळ तो आला बरसत , नद्या धबधबे तोषे गर्जत

कुंदवात तो दरवळण्यासी ,आला श्रावण आला श्रावण


सोनसळी हिरवाई घेऊन , सृष्टी आली फुलुनी बहरुन

नवचैतन्य जागविण्यासी ,आला श्रावण

आला श्रावण


नवपरिणित ती मोदे नहाता ,

तनमन त्यांचे बहरुन येता

नवमीलन फुलविण्यासी, आला श्रावण आला श्रावण


ओलेती नव प्रतिभा खुलवीत , साज तयाला मोदे घालत

काव्य बहरविण्यासी , आला श्रावण आला श्रावण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract