आकांक्षांची विमाने
आकांक्षांची विमाने
आकांक्षांची विमाने तुमच्या
नेहमी उंचच उंच उडू द्या
मनातलं पोटात, पोटातलं
ओठांवर मात्र नक्की येऊ द्या
आकाशात विहार करताना परि
पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवा
प्रगतीचा गाठा एक एक टप्पा
तुमच्या यशाचा आदर्श मागे ठेवा
चूक अपयश मानावे सदा गुरु
संकटे आली तरी कर्म असावे सुरू
मनाला बुद्धीवर स्वार नका करु
संयमाने दौडू दे विचारांचा वारु